अफगाण उपाध्यक्षांच्या वाहन ताफ्यावर हल्ला

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये बुधवारी झालेल्या बॉम्बहल्ल्यात देशाच्या पहिल्या उपाध्यक्षांच्या वाहन ताफ्याला लक्ष्य करण्यात आले असून या हल्ल्यात १० जण ठार झाले आहेत. त्यात उपाध्यक्षांच्या काही अंगरक्षकांचा समावेश आहे, असे अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजून कुणी घेतलेली नसून तालिबानने या हल्ल्यात सामील असल्याचा इन्कार केला आहे.
अफगाणिस्तानाचे पहिले उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह हे किरकोळ भाजले आहेत. सालेह हे अफगाणिस्तानचे माजी गुप्तचर प्रमुख असून त्यांनी हल्ल्यानंतर दूरचित्रवाणीवर सांगितले, की त्यांची प्रकृती उत्तम आहे. मी व माझा मुलगा एकत्र होतो, पण आम्ही वाचलो आहोत. जे मरण पावले त्यांच्या नातेवाइकांच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे प्रवक्ते रझवान मुराद यांनी हा भयानक दहशतवादी हल्ला असल्याचे सांगून त्यात सालेह यांना ठार मारण्याचा इरादा होता असे म्हटले आहे.अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे, की सालेह हे काबूलमधील एका भागातून जात होते. त्या भागात गॅस सिलिंडरची दुकाने आहेत, त्या ठिकाणी हा स्फोट झाला असून यात १० दुकाने कोसळली आहेत. काही गाडय़ांचे नुकसान झाले आहे. तर एकूण १५ जण जखमी झाले आहेत.तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने या हल्ल्यात सहभागाचा इन्कार केला असून आजच्या स्फोटाशी आमचा संबंध नाही, अफगाणिस्तानात तालिबान व आयसिस कार्यरत असून आता कुणावर संशय घ्यायचा हा प्रश्न आहे. अमेरिकेचे शांतता दूत झालमय खलिलाझाद हे कतारमध्ये असून तालिबानशी चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget