‘मेट्रो-३’ प्रकल्पाजवळ रस्ता खचला

मुंबई - ‘मुंबई मेट्रो-३’ रेल्वे मार्गावरील एक रेल्वे स्थानक गिरगावातील जगन्नाथ शंकरशेट मार्गावरील क्रांतिनगरसमोर उभारण्यात येत आहे. या मेट्रो रेल्वे स्थानकाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. तसेच या कामामुळे आसपासच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. क्रांतिनगरसमोरील रस्त्याचा मोठा भाग बुधवारी सकाळी ७च्या सुमारास खचला आणि एकच गोंधळ उडाला. रस्ता खचल्यामुळे गिरगाव चर्च ते ठाकूरद्वार दरम्यानचा जगन्नाथ शंकरशेट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परिणामी, बेस्टच्या बसगाडय़ा महर्षी कर्वे मार्गावरून सोडण्यात आल्या. वाहतुकीसाठी रस्ता बंद केल्यामुळे गिरगाव परिसरात वास्तव्यास असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्टच्या बससाठी पायपीट करावी लागली.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन , मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. भुसभुशीत झालेल्या रस्त्याखाली १८ ते २० फूट खोल खड्डा पडल्याचे निदर्शनास आले. तसेच या खड्डय़ात मोठय़ा प्रमाणावर पाणी होते. ‘मेट्रो-३’च्या स्थानकाचे काम सुरू होण्यापूर्वी रस्त्याखालून जाण्यारी जलवाहिनी पदपथावर स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे जलवाहिनीला कोणताही धोका नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget