मुख्यमंत्र्यांसह नेत्यांना धमकी देणाऱ्या आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक

मुंबई - काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन करणाऱ्या पलाश घोष (४९)आरोपीला पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली होती. या आरोपीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबईमधील मोबाईल सीमकार्डचा वापर करीत धमकी दिल्याचे समोर आले आहे. सर्व नेत्यांना धमकी देणारा आरोपी एकच असल्याचे तपासात समोर आले आहे.
दहशतवाद विरोध पथकाने (एटीएस) आतापर्यंत केलेल्या चौकशी दरम्यान आरोपी पलाश घोष हा पंधरा वर्षांहून अधिक काळ दुबईमध्ये राहत होता. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्याकडे असलेल्या दुबईमधील मोबाइल क्रमांकावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे वारंवार फोन करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या कॉल दरम्यान तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक असल्याचेही सांगितले होते. मुंबई पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक आरोपींकडून मोबाइल हँडसेट , एक भारतीय सीमकार्ड व दुबईमधील मोबाईल, सीमकार्ड हस्तगत केले आहेत .
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget