कुटुंबापलीकडे विचार करा... पुन्हा एका पत्रातून सोनिया गांधींना सल्ला

नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षात आलेली नाराजी, पक्षनेतृत्त्व याविषयी वादळ शमत नाही, तोच आता आणखी एका पत्रामुळे काँग्रेसमध्ये वादळ उठणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.पक्षातील परिस्थितीबाबत हे पत्र आले असून, थेट उत्तर प्रदेशातून. मागील वर्षी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या ९ काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना हे पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये त्यांनी सूचक इशारा देत पक्षाला 'इतिहास' होण्यापासून वाचवण्याची बाब अधोरेखित केली आहे. 
काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या पक्ष प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर पत्रातून अप्रत्यक्ष निशाणा साधण्यात आला. चार पानांच्या या पत्रातून सोनिया गांधी यांनी कुटुंबापलीकडेही विचार करावा असा आग्रही सूर आळवण्यात आला आहे. 'परिवार के मोह से ऊपर उठें', असे या पत्रात स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे. शिवाय पक्षातील लोकशाही परंपरेला पुन्हा संजीवनी द्यावी असे म्हटले आहे. 
संतोष सिंह, सत्यदेव त्रिपाठी, विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह यांच्या स्वाक्षरी असणाऱ्या या पत्रातून काँग्रेस सध्या आव्हानात्मक काळातून जात असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. जवळपास वर्षभरासाठी आपल्या भेटीसाठी वेळ मागत असूनही आम्हाला वेळ दिली जात नाही हा मुद्दा पत्रातून उचलून धरण्यात आला. आपल्या निलंबनाबाबत केलेल्या आवाहनाबाबत देश पातळीवर काम करणाऱ्या समितीला विचार करण्याचाही वेळ मिळाला नसल्यामुळे याबाबतची नाराजीही व्यक्त करण्यात आली. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget