भूकंपाच्या धक्याने जम्मू काश्मीर हादरले

श्रीनगर - जम्मू काश्मीर भागातील सीमा क्षेत्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारी तणावाची परिस्थिती असतानाच मंगळवारी या भागामध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. जम्मू आणि बहुतांश काश्मीर भागाला बसलेला हा हादरा आणि त्यानंतर आलेल्या ध्वनीलहरी पाहता स्थानिकांच्या मनात मात्र एक वेगळीच धास्ती पाहायला मिळत आहे. एक मोठा आणि भीषण स्फोट व्हावा, असा आवाज झाल्याची माहिती स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार सदर भागात भूकंपाचा धक्का जाणवला.श्रीनगरमध्येही हा हादरा जाणवला. पीटीआय या वृत्तसंस्थेनेही याबाबतची माहिती देत रात्री ९.४० वाजण्याच्या सुमारास या भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. स्थानिकांमध्ये या घटनेमुळे एक मोठा स्फोट झाल्याची धास्ती निर्माण झाली. 'बीबीसी'च्या वृत्तानुसार एका वरिष्ठ पत्रकाराने या हादऱ्यांबाबत एक वेगळाच संशय व्यक्त केला आहे. २७ ऑगस्टला श्रीनगर विमानतळानजीक भारतीलय वायुदलाने अंडरग्राऊंड स्फोटकांबाबत जी शक्यता वर्तवली होती हा त्याचाच स्फोट तर नव्हता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. EMSCच्या म्हणण्यानुसार याचे केंद्र शिनजियांग होते. पण असे असल्यास सऊरा, सोनमर्ग, कारगिल, लेह आणि गिलगिट येथे हे हादरे का जाणवले नाही? असा प्रश्न मांडत जाणवलेला धक्का हा अवघ्या काही सेकंदांसाठी आणि अवघ्या श्रीनगरनजीकच्याच भागापुरताच कसा सीमीत होता अशी शंका व्यक्त केली. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget