देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांची गुप्त भेट

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याची चर्चा आता रंगू लागली आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाली आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही भेट झाली आहे. सुमारे दोन तास बैठक झाल्याची चर्चा आहे.शिवसेनेकडून भेटीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले होते. त्यात त्यांनी एक शेर पोस्ट केला होता. भेटीआधीचे हे सूचक ट्विट होते. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय भूंकपाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या भेटीमागचे अनेक तर्क काढण्यात येत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊनच ही भेट झाली होती, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखत घेण्याचा संजय राऊत यांचा विचार होता, असेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

संजय राऊत यांनी दैनिक 'सामना'ठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असे स्पष्टीकरण विधानपरिषद विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी दिले आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकते, आम्ही कोणतीही गोष्ट नाकारत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली होती. प्रवीण दरेकर यांना विचारले असता, तूर्तास तरी ही भेट ही प्राथमिक स्तरावर होती असे त्यांनी म्हटले आहे. पण आत्ताच या भेटीबाबत काही सांगता येणार नाही, असे प्रवीण दरेकर यांनी आधी स्पष्ट केले. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget