रघुवंश प्रसाद सिंह यांचे निधन

नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचे रविवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते सिंह हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती.सिंह यांच्या राजदचा दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. त्यांच्या निधनानंतर लालू प्रसाद यादव यांनी शोक व्यक्त केला. .
रघुवंश प्रसाद यांच्या निधनाचे वृत्त समजताच बिहारमध्ये राजकीय वर्तुळातून दुःख व्यक्त केले जात आहे. आयसीयू वार्डात असतानाच रघुवंश प्रसाद सिंह यांनी राजदचा राजीनामा दिला होता. रघुवंश प्रसाद यांच्या निधनानंतर राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. “प्रिय रघुवंश बाबू, हे आपण काय केले ? मी परवाच आपल्याला सांगितले होते की, तुम्ही कुठेही जात नाही आहात. पण, तुम्ही इतके दूर निघून गेलात. निशब्द झालोय.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget