मदन शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतली भेट

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याच्या कारणावरुन, मुंबईतील माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. तर, मदन शर्मा यांनी आज या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर, माध्यमांशी बोलताना एक मोठे विधान केले. मी आतापासून ‘भाजपा-आरएसएस’ सोबत आहे, असे त्यांनी जाहीर केले.“आतापासून मी भाजपा-आरएसएस सोबत आहे. जेव्हा मला मारहाण झाली, तेव्हा त्यांनी मी भाजपा-आरएसएस सोबत असल्याचे माझ्यावर आरोप केले होते. तर आता मीच हे जाहीर करतो की, आतापासून मी भाजपा-आरएसएस सोबत आहे.” अशी शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतल्यानंतर माध्यमांसमोर ही घोषणा केली.राज्यपालांकडे आपण राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असल्याची माहिती देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. भाजपा नेते अतुल भातखळकरदेखील यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने माफी मागितली पाहिजे असे ते म्हणाले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget