येरवडा कारागृहातून कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले

पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव कारागृहातील कैद्यानांवरही होत आहे. मात्र, अशा परस्थितीत येरवाडा कारागृहातील २ कोरोनाबाधिक कैद्यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास पळ काढल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या इमारतीच्या कारागृहात या कैद्यांना ठेवण्यात आले होते. कारागृहातील खिडकीचे गज कापून या कैद्यांनी पळ काढला. अनिल विठ्ठल वेताळ (वय २१) आणि विशाल रामधन खरात अशी पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत. हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
तात्पुरता कारागृहातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील १०४ क्रमांकाच्या खोलीत या कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. मध्यरात्रीच्या सुमारास या कैद्यांनी खिडकीचे गज कापले आणि पळ काढला. यातील अनिल वेताळ हा भीमा कोरेगाव येथील रहिवासी असून तो शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता. दुसरा आरोपी विशाल रामधन खरात हा पिंपरी-चिंचवड परिसरातील निगडीतील रहिवाशी आहे. चिखली पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यात तो कारागृहात होता. हे दोघेही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.यापूर्वीही येरवडा कारागृहातील तात्पुरत्या इमारतीतून गंभीर गुन्हे असलेल्या पाच कैद्यांनी पळ काढला होता. पोलिसांनी पळून गेलेल्या पाचही कैद्यांना पुन्हा पकडून तुरुंगात टाकले आहे. परंतु तात्पुरत्या कारागृहातून अशा प्रकारे वारंवार कैदी पळून जाण्याच्या घटना घडत असल्यामुळे कारागृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget