भावाच्या मागणीनंतर बहिणीच्या कारखान्याला ११ कोटींची थकहमी

बीड - परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला दहा कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी द्यावी, अशी आग्रही मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्यानंतर ती राज्य सरकारने मंजूर केली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील या कारखान्याला मदत करावी अशी भूमिका घेताना साखर कारखान्याच्या विषयात राजकारण आणणार नसल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.बीड जिल्ह्यातील भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची धुरा भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी पगारासाठी उपोषण केले. तसेच एफआरपी प्रमाणे पैसे मिळाले नसल्याने कारखाना आर्थिक अडचणीत आला असल्याचे समोर आले होते. महाविकास आघाडीने राज्यातील ३२ साखर कारखान्यांना थकहमी देण्याचा निर्णय घेतला असून त्यात वैद्यनाथ साखर कारखान्याला १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी दिली आहे. पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी आग्रही मागणी केली. राजकीय विरोध बाजूला ठेवून धनंजय मुंडे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आल्यानंतर पाच वर्षांतच कर्मचाऱ्यांवर थकीत पगारासाठी उपोषणाची वेळ आली हे दुर्दैव. आता तरी गळीत हंगाम सुरू करून परिसरातील उसाचे गाळप करावे आणि शेतकरी व कर्मचाऱ्यांचे हित जोपासून वैद्यनाथ सांभाळा असा टोलाही लगावला. 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget