नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळवून देणार - एकनाथ शिंदे

गडचिरोली - जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पुरामुळे भातपीक, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूर ओसरताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे नगरविकास तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बिकट पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोसीखुर्द धरणातून पाणी सोडल्याने ही पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तरीही गडचिरोलीमधील पूर ओसरण्यास आणखी एक दिवस लागेल.असे वर्तविण्यात येत आहे. 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget