ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचे परीक्षण थांबवले

वॉशिंग्टन - अ‌ॅस्ट्राझेनेका कंपनीमार्फत होत असलेल्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीचे परीक्षण तात्पुरते थांबवण्यात आले आहे. या लसीचा डोस दिलेल्या व्यक्तीला या लसीचे दुष्परिणाम जाणवू शकतात, असे म्हणत कंपनीने याबाबत निर्णय घेतला. सुरक्षेसंबंधी माहितीचा आढावा घेण्यासाठी ही चाचणी तात्पुरती थांबवण्यात आल्याचे कंपनीने मंगळवारी एका निवेदनाद्वारे जाहीर केले.
दरम्यान, या लसीमुळे नेमका कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम झाले आहेत याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. आरोग्यासंबंधी माहिती देणारी वृत्तसंस्था 'स्टॅट'ने सर्वप्रथम याबाबतची माहिती दिली. युनायटेड किंगडममधील एका व्यक्तीला याचे दुष्परिणाम जाणवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले होते. यावर अ‌ॅस्ट्राझेनेका कंपनीच्या प्रवक्त्याने अमेरिका आणि इतर देशांमध्ये सुरू असलेल्या चाचण्या थांबवण्यात आलेल्या वृत्तास दुजोरा दिला.गेल्या महिन्यात अ‌ॅस्ट्राझेनेकाने कोरोना लसीच्या सर्वात मोठ्या चाचणीसाठी अमेरिकेत जवळपास ३० हजार स्वयंसेवकांची नोंदणी सुरू केली होती. अशाच प्रकारच्या चाचण्या ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका अशा देशांमध्येही सुरू आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची चाचणी पुण्यातील सीरम इन्स्टीट्युटकडूनही केली जात आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget