सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना दिला सल्ला

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवली. सीबीआयकडे चौकशी सोपवल्यानंतर या प्रकरणी अनेक नवी माहिती समोर आली. दरम्यान, ८ माजी आयपीएएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सुशांत सिंह प्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर आज सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने माध्यमांना संयम ठेवण्यास सांगितले.
आठ माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी सुशांत सिंह प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर मीडिया ट्रायल थांबवण्यासाठी न्यायालयात ३१ ऑगस्ट रोजी याचिका दाखल केली होती.सुशांत सिंह प्रकरणी वार्तांकन करताना माध्यमांनी संयम ठेवावा. तसेच तपासावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही अशा प्रकारे वार्तांकन करावे, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले.
राज्यातील माजी डीजीपी एम.एन.सिंग, पी.एस. पसरिचा, डी.के.सिवानंदन, संजीव दयाल, सतीश माथूर, के.सुब्रमण्यम, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी.एन. जाधव आणि माजी अतिरिक्त डीजीपी के.पी.रघुवंशी यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. “या प्रकरणाचा तपास नैतिकदृष्ट्या, निष्पक्षपणे आणि वस्तुनिष्ठ केला जावा. तसेच वार्तांकन हे पोलीस किंवा अन्य लोकांच्या विरोधात मोहिमेसारखे बदलू नये, असे याचिकाकर्त्यांनी नमूद केले होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget