बाबरी पाडणारे आम्हीच आहोत ; कंगनाच्या ‘बाबर सेना’ टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई - कंगना रणौत विरुद्ध शिवसेना वाद आता शिगेला पोचला आहे. कंगनाने मुंबईला पाकिस्तान संबोधण्यासह मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासनाबद्दल केलेल्या ट्विटवरून हा वाद चांगलाच टोकाला गेला. कंगनाच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामाच्या कारणावरून मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवल्यानंतर संतप्त झालेल्या कंगनाने वाटेल तसा निशाणा साधत शिवसेनेला बाबरची सेना देखील म्हटलं. कंगनाच्या या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कारवाईमागे कोणतीही बदल्याची भावना नाही ”बाबरी तोडणारे लोक आम्हीच आहोत. त्यामुळे बाबर आणि बाबरी बद्दल तिने न बोललेच बरे असे चोख प्रत्युत्तर दिले आहे.राऊत पुढे म्हणाले, कंगना रणौतशी माझे वैर नाही. ती एक कलाकार आहे. मुंबईत राहते. पण ज्या प्रकारची भाषा तिने मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांबद्दल वापरली आहे. ती सहन करण्यासारखी नाही. कंगनाने जर आपले म्हणणे मागे घेतले, तर वाद राहणारच नाही” तसेच महापालिकेने केलेली कारवाईचे प्रकरण आता उच्च न्यायालयाकडे आहे. त्यामुळे महापालिका न्यायालयात उत्तर देईल. या कारवाईमागे कोणतीही बदल्याची भावना नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.माझ्यासाठी अभिनेत्रीसोबतचा वाद संपला आहे. विधानसभेत कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला आहे. गृहमंत्र्यांनीही याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे कायदा काम करत असताना माझे बोलणे बरोबर नाही,” असेही राऊत यावेळी यांनी स्पष्ट केले. बुधवारी कंगनाच्या पाली हिल येथील घरातील अनधिकृत बांधकामाचा भाग मुंबई महापालिकेने पाडला. त्यानंतरक मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या कंगनाने बीएमसी आणि शिवसेना म्हणजे बाबर आणि त्यांचे कर्मचारी म्हणजे बाबराचे सैन्य असल्याची टीका केली होती. तसेच कंगनाने राज्याच्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत काही बेताल वक्यव्येही केली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget