कृषी विधेयकाविरोधात काँग्रेस आक्रमक देशभरातून आंदोलन

मुंबई - केंद्र सरकारने मित्र पक्षांची पक्षांशी चर्चा न करता संसदेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात राज्यात काँग्रेस आक्रमक झाले आहे.केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात काँग्रेसने राज्यात आंदोलन सुरू केले आहे.काँग्रेसने केंद्राच्या या विधेयकाविरोधात मागील काही दिवसांपासून रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शविला आहे. हे विधेयक रद्द करावेत यासाठी मंगळवारी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले.संसदेत हे विधेयक मंजूर करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेत जोरदार विरोध दर्शवला होता. तर सेनेने मात्र कोणतीही भूमिका घेतली नव्हती. राज्यसभेत हेच विधेयक आल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीसह सेनेच्या खासदारांनीही सभात्याग करून आपला विरोध दर्शवला होता. त्यानंतर राज्यात काँग्रेसने या विधेयकाच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे.

सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, मोदी सरकारने राज्यांना विश्वासात न घेता मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांची महाराष्ट्रात अंमलबजावणी करायची की नाही, यासंदर्भातला निर्णय सर्वांशी चर्चा करुन लवकरच घेतला जाणार आहे. केंद्राला ज्या प्रमाणे कायदे करण्याचा अधिकार आहे, तसाच राज्यांनासुद्धा असल्याचे पाटील यांनी सांगितले.केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात एकतर्फी विरोधी पक्ष आणि आपल्याही ही मित्रपक्षांना विचारात न घेता कृषी विषयक तीन विधेयके रेटून ते मंजूर करून घेतली. त्यावर देशभरातील शेतकरी संघटनांमध्ये पडसाद उमटले आहेत. देशभरातून अडीचशेहून अधिक शेतकरी संघटनांनी हा काळा कायदा आहे, असे सांगत आपला विरोध सुरू ठेवला आहे. तर काँग्रेसनेही या विरोधात देशभरात मोहीम उघडली आहे.

सहकार मंत्री पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्याला अनेक राज्यांचे तीव्र आक्षेप आहेत. आमचाही विरोध आहे. या विधेयकांवर आमच्या शिर्ष नेत्यांनी भूमिका व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी तीन पक्षाचे सरकार आहे. याप्रश्नी सर्वांशी चर्चा करुन भूमिका ठरवली जाईल. मंत्रीमंडळ बैठकीत यावर चर्चा होऊ शकते. त्यानंतर उपसमिती स्थापन होईल आणि ती निर्णय घेईल, असे पाटील यांनी सांगितले.कृषी विधेयकावर आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका नाही. संबधीत कृषी विधेयके शेतकऱ्यांच्या विरोधी असू नयेत, अशी सरकारची भूमिका आहे राज्यातील आघाडी सरकारमधील काँग्रेसने कृषी विधेयकांविरोधात आंदोलनास प्रारंभ केला आहे. तसेच या विधेयकांसंदर्भात निश्चित भूमिका घेण्याची दोन्ही मित्रपक्षांना आग्रही मागणी केली आहे. मात्र राष्ट्रवादी व शिवसेनेने अद्याप काँग्रेसला प्रतिसाद दिलेला नाही. याप्रश्नी एकमत न झाल्यास सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget