'एनएसडी'च्या प्रमुखपदी अभिनेते परेश रावल यांची नियुक्ती

नवी दिल्ली - अभिनेते परेश रावल यांची राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा-एनएसडी) संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भाजपचे माजी खासदार परेश रावल यांची नियुक्ती केली. यावर परेश रावल यांनी आनंद व्यक्त केला असून हे कार्य आव्हानात्मक मात्र, मजेदार असणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली केंद्रीय सांस्कृतीक राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी परेश रावल यांना शुभेच्छा दिल्या. याबाबत त्यांनी टि्वट केले आहे. प्रसिद्ध अभिनेता परेश रावल यांची एनएसडीचे संचालक पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या प्रतिभेचा आणि अनुभवांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल, असे प्रल्हाद सिंह पटेल यांनी टि्वट केले आहे. दरम्यान, परेश रावल हे वामन केंद्रे यांची जागा घेणार आहे. २०१४ मध्ये प्रा. वामन केंद्रे यांची एनएसडीच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती.परेश रावल हे एक चित्रपट कलावंत आहेत. त्यांनी विनोदी भूमिकांबरोबरच चरित्र कलावंतांच्याही भूमिका समर्थपणे केल्या आहेत.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget