अमृतसर, पाकिस्तानपर्यंत ड्रग्जचे कनेक्शन

नवी दिल्ली - अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रगच्या पैलूने केल्या जात असलेल्या चौकशीतून ड्रगच्या कारभाराचे धागेदारे अमृतसर आणि पाकिस्तानमधील अमली पदार्थाचा कारभार करणाऱ्या टोळ्यांपर्यंत पोहोचले आहेत. ग्राहक ते ड्रग विक्रेते आणि पुरवठादारांसह ड्रगच्या कारभारात कोण आहेत, याचा शोध एनसीबी घेत आहे. बॉलीवूडमधील पूर्वीच्या आणि आजच्या प्रसिद्ध व्यक्तीही एनसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे.चौकशीशी संबंधित एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बॉलीवूडमधील ड्रगच्या कारभारात आणि मुंबईत ड्रगचा पुरवठा करणारे कोण आहेत, याचा अंदाज आला आहे. हेरॉईन, कोकेन आणि अन्य अमली पदार्थाचे ग्राहक आणि त्यांना अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवर आरोप ठेवण्यासाठी ठोस पुरावे गोळा केले जात आहेत. ड्रगच्या कारभाराशी संबंधित अमृतसरमधील एका व्यक्तीला एनसीबी पाचारण करण्याची शक्यता आहे. मुंबईतील कोकेनचा पुरवठा करणाऱ्यांचा छडा लावण्यासाठी एनसीबीने अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या अमली पदार्थाविरोधी संस्थाचीही मदत मागितली आहे. सहयोगी संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१८ मध्ये भारतात १,२०० किलोग्रॅम कोकेन आले होते. यापैकी ३०० किलोग्रॅम कोकेन मुंबईत पोहोचले होते. जून २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियात ५५ किलो कोकेन जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीतून उपरोक्त माहिती उघड झाली.

ऑस्ट्रेलियाच्या माहितीच्या आधारे एनसीबीने गुन्हा दाखल केलेला आहे.कोलंबिया-ब्राझील आणि मोझाम्बिकमार्गे भारतात कोकेन आले. यासाठी आफ्रिका आणि दुबईतून काही ठिकाणांचा पयार्यी मार्ग म्हणून वापर करण्यात आला. भारतात मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम परमँग्नेट उत्पादन केले जाते. त्याचा वापर कोकेन प्रकियेत केला जातो.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget