चंदीगडमध्ये पोहोचताच कंगनाने ट्विट केले 'यावेळी मी वाचले...'

चंदीगड - महाराष्ट्र सरकारसोबत वाद झाल्यानंतर आज अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई सोडली आहे. कंगनाने चंदीगडला पोहोचून एक ट्विट केले. यामधून तिने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कंगनाने लिहिले आहे की, मुंबई पहिल्यासारखी सुरक्षित राहिलेली नाही. शिवसेना आता सोनिया सेना झाल्याचे कारण दिले आहे. कंगना राणौतने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की,'चंदीगडमध्ये उतरताच माझी सुरक्षा फक्त नावासाठी राहिली. लोकं आनंदाने मला शुभेच्छा देत आहे. असे वाटते यावेळी मी वाचले. एक दिवस असा होता जेव्हा मुंबई मातेच्या छत्रछाये खाली अतिशय सुरक्षित वाटायचे. मात्र आज तो दिवस आहे, जीव वाचला तो दिवस लाखमोलाचा. शिवसेना ते सोनिया सेना होताच मुंबईत दहशतवादी प्रशासनाचा बोलबाला. 
मुंबईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत हिला अनेक स्तरांतून विरोधाचा सामाना करावा लागला. शिवसेनेकडूनही कंगनावर तिच्या या वक्तव्यासाठी सातत्यानं निशाणा साधण्यात आला. सध्याच्या घडीला हाती आलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलेल्या कंगनाने पुन्हा एकदा मुंबई सोडल्याचे म्हटले जात आहे. गेल्या बऱ्याच काळापासून महाराष्ट्र शासनाची कंगनाविरोधी भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाय मुंबई पालिका प्रशासनाकडून तिचे घर आणि कार्यालयावरही कारवाई करण्यात आली, परिणामी हा संघर्ष वादग्रस्त वळणावर आल्याचे पाहायला मिळाले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget