‘उद्धव ठाकरेंनी करोनाशी लढावे कंगनाशी नाही’ - फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई - राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असतानाच अभिनेत्री कंगना रणौतनं केलेल्या विधानांवरून राजकारण पेटले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाषणात नाव न घेता भाजपा आणि कंगनावर टीका केली होती. यावर विचारलेल्या प्रश्नांवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत प्रत्तुत्तर दिले आहे.रविवारी बौद्धगया येथे झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांना महाराष्ट्रात गाजत असलेल्या मुद्यांसदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “आज महाराष्ट्रात करोना महामारीचे मोठे संकट आहे. आजघडीला १० लाखांपेक्षा जास्त करोनाचे रुग्ण आहेत. देशात करोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूपैकी चाळीस टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात दिवसाला २३ ते २५ हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मला वाटतंय की आमच्या मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या संकटावर अधिक लक्ष दिले पाहिजे. राजकारण, कंगनाचा विषय किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडून नेव्ही अधिकाऱ्यावर झालेला हल्ला या सगळ्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष असले पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी त्यांनी करोनाशी लढाई लढावी. विरोधी पक्षासोबत किंवा कंगनासोबत नाही,” असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget