उद्धव ठाकरेंची बदनामी ; कंगनाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत बॉलिवूड माफियांशी संबंध असल्याचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत हिच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याप्रकरणी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कंगनाचा पाली हिल येथील बंगल्याचे बांधकाम तोडण्याशी कुठलाही थेट संबंध नसताना ट्विटरवर व्हिडिओ अपलोड करून मुख्यमंत्र्यांवर आरोप करून त्यांची बदनामी केल्याचा तक्रारदार अँडव्होकेट नितीन माने यांनी आरोप केला आहे. याप्रकरणी विक्रोळी कोर्टातही अब्रूनुकसानीचा खटला कंगनाविरोधात चालवला जाणार असल्याच नितीन माने यांनी म्हटले आहे.कंगना रानौत ही मुंबईत पोहोचली आहे. मात्र, तिने आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. व्हिडिओ शेअर करत मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. 'तुमने जो किया अच्छा किया. उद्धव ठाकरे आज माझे घर तोडले आहे, उद्या तुमचे गर्वहरण होईल, असे कंगनाने म्हटले आहे. यावेळी कंगनाने पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे.
काश्मिरी पंडितांना कसे वाटते, हे मला आज समजले. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासियांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगले आहे, कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.'' असेही कंगनानं व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget