‘एससीओ’च्या परिषदेतून अजित डोभाल यांचा सभात्याग

नवी दिल्ली - भारताचा भूप्रदेश हा पाकिस्तानचा भाग असल्याचे दर्शविणाऱ्या खोटय़ा नकाशाचा वापर पाकिस्तानने केल्याने शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (एनएसए) परिषदेतून मंगळवारी भारताने सभात्याग केला.दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे मंगळवारी ‘एससीओ’च्या सुरक्षा सल्लागारांची बैठक सुरू होती. त्यात पाकिस्तानचे मोईद युसूफ यांनी जम्मू-काश्मीर हा वादग्रस्त भाग असल्याचे दाखवणारा नकाशा प्रदर्शित केला. या प्रकाराचा निषेध करत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सभात्याग केला, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.पाकिस्तानने या कृतीद्वारे यजमान रशियाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केला. त्यामुळे रशियाशी चर्चा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget