निलंबित खासदार संसदेच्या बाहेर रात्रभर उपोषण करणार

नवी दिल्ली -
 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान आठ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यानंतर निलंबित खासदार संसदेच्या प्रांगणातील गांधी पुतळ्यासमोर उपोषणाला बसले आहेत. निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत ते रात्रभर बसून राहतील असे निलंबित खासदारांचे म्हणणे आहे. हे निलंबित खासदार संसदेच्या कार्यवाहीतून निलंबनाचा निर्णय मागे घेण्याची मागणी सातत्याने करत आहेत. गुलाम नबी आझाद यांनी म्हटले की, राज्यसभेच्या उपसभापतींना कुणी हात लावला नाही.काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांनीही उपोषणाला बसलेल्या खासदारांना पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले की, 'हे विधेयक शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे. शेतकरीविरोधी आहे. हे विधेयक जबरदस्तीने राज्यसभेत मंजूर झाले. डिविजन मागितला गेला पण दिला गेला नाही. राज्यसभेत बहुमत हे या विधेयकाच्या विरोधात असतानाच ते मंजूर झाले.राज्यसभेत गदारोळ सुरू असताना खासदारांनी कोणालाही स्पर्श केला नाही. उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांना किंवा उपस्थित मार्शल यांना देखील कोणी हात लावलेला नाही. आझाद म्हणाले की, एक वाजेनंतर कामकाज वाढवायचे असेल तर त्याची हाऊस सेंस घेतले जाते. जे खासदार नियम सांगत होते, प्रक्रिया सांगत होते, परंपरा सांगत होते, त्यांनाच सभागृहातून काढून टाकण्यात आले.उपोषणाला बसलेले खासदार रात्रभर धरणे आंदोलनाला बसतील. उद्या राज्यसभेत निलंबनाबाबत काय निर्णय होतो, त्यावर पुढील गोष्ट अवलंबून असेल असे खासदारांचे म्हणणे आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget