आता सुटी सिगारेट, बिडी विक्रीला राज्यात बंदी ; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई - राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाने एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, राज्यात आता कुठेही पान बिडी दुकानात अथवा राज्यात कुठेही सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घालण्यात आली आहे.

आरोग्य विभागाने एक नवीन आदेश जारी केला आहे.राज्यात सुट्टी सिगारेट आणि बिडीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी हा निर्णय घेण्यासाठी अनेक वेळा बैठका झाल्या होत्या. मात्र, यावर निर्णय होऊ शकला नव्हता. यासाठी  विधी व कायदा विभागासह सरकारकडे आरोग्य विभागाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यावर कोणताही निर्णय विधी विभागाकडून देण्यात आला नव्हता.

‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३’ ( जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) नुसार सिगारेटच्या पाकिटाच्या ८५ टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश असावे बंधनाकारक करण्यात आले होते. त्यामुळे सिगारेट हे आरोग्यास धोक्याचे असल्याचा संदेश दिला गेला. पण, आता अनेक पानटपऱ्यांवर सिगारेटच्या पाकिटातून एक-एक सिगारेटची आणि बिडीची विक्री केली जात आहे. याला आळा घालण्यासाठी सुट्टी सिगारेट आणि बिडी विक्रीवर बंदी आणावी असा प्रस्ताव आरोग्य विभागाने विधी व न्या विभागाकडे पाठवला. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

विशेष म्हणजे, अनेक राज्यात असा नियम बंधनकारक करण्यात आला आहे. यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे सुद्धा राज्यात असा निर्णय व्हावा यासाठी आग्रही होते. त्यामुळे आता सर्व कायदेशीर बाजू तपासल्यानंतर राज्यात कोणत्याही पान-बिडी शॉप किंवा दुकानांवर यापुढे सुटी सिगारेट किंवा बिडी विकता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget