'बजाज फायनान्स'ला मनसेचा दणका

मुंबई - केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने कोरोनामुळे निर्माण जालेल्या आर्थिक संकटात रिक्षाचालकांना कोणताही आर्थिक दिलासा दिलेला नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यामुळे बजाज फायनान्सला आपल्या १ लाख १९ हजार ७४३ रिक्षा कर्ज ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याचा निर्णय घेणे भाग पडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मुंबईत ‘महाराष्ट्र गड’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीमुळे राज्यातील रिक्षा मालकांना पाच महिने कोणत्याही प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. अशा स्थितीत रिक्षासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. अशा आशयाच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडे आल्या होत्या.याबाबत बजाज कंपनीकडून रिक्षा कर्ज ग्राहकांना सहकार्य व्हावे, यासाठी मनसेने आधी बजाज कंपनीशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर गोरेगाव येथील बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक देऊन रोखठोक इशारा दिला. यानंतर बजाज फायनान्सचे वरिष्ठ अधिकारी आणि मनेसेचे संजय नाईक, कीर्तिकुमार शिंदे यांच्यात चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. या चर्चेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुचवलेली योजना बजाज फायनान्सने मान्य केली.बुधवारी संध्याकाळी उशीरा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योजनेचे लेखी पत्र मनसेला दिले. यामुळे रिक्षा मालकांना टाळेबंदीच्या काळात थकलेले हप्ते व बाऊन्स झालेले चेक यावरचा दंड तसेच हप्ता उशीरा भरल्याचा दंड बजाज कंपनीने माफ केले आहे. याचा महाराष्ट्रातील सुमारे १ लाख १९ हजार ७४३ रिक्षाचालकांना होणार आहे.यानुसार राज्यातील १ लाख १९ हजार ७४३ रिक्षा मालकांची प्रत्येकी किमान ३ हजार २०० रुपये ते जास्तीत जास्त ४ हजार रुपये इतकी बचत होणार आहे. तसेच त्यापोटी बजाज फायनान्सला किमान ३८ कोटी ते कमाल ४७ कोटी इतक्या निधीवर पाणी सोडावे लागणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget