‘राफेल’चा अखेर हवाई दलात समावेश

अंबाला - युद्धाच्या प्रसंगात भारताला हवाई वर्चस्व मिळवून देणाऱ्या अत्याधुनिक ‘राफेल’ फायटर विमानांचा आज इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समारंभपूर्वक समावेश करण्यात आला. अंबाला एअर बेसवर झालेल्या शानदार सोहळयात ‘राफेल’ फायटर विमाने भारतीय वायू दलाचा भाग झाली. ४.५ जनरेशनचे हे फायटर विमान अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण आहे.राफेलच्या पहिल्या तुकडीत पाच विमाने असून Golden Arrow म्हणून ही स्क्वाड्रन ओळखली जाईल. २९ जुलैला राफेल फायटर विमानांचे भारतात आगमन झाले होते. पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांच्यात सीमेवर प्रचंड तणावाची स्थिती असताना राफेल विमानांचा आज औपचारिकरित्या इंडियन एअर फोर्समध्ये समावेश झाला.अंबाला एअर बेसवर झालेल्या या कार्यक्रमाला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली, IAF प्रमुख आर.के.भदौरिया, सीडीएस बिपीन रावत, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि फ्रान्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राफेलचा समावेश करताना पारंपरिक सर्वधर्म पूजा करण्यात आली तसेच तेजस विमानांसह ‘सारंगने हवाई चमूने चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. २०१६ मध्ये भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदीचा ६० हजार कोटींचा करार केला होता. त्यातली पहिली पाच विमाने भारताला मिळाली आहे. पुढच्या दोन ते तीन वर्षात टप्याटप्याने उर्वरित राफेल विमाने भारताला मिळतील.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget