अभिनेत्री कंगना रनौतला पोलीस संरक्षण

शिमला - हिमाचल प्रदेश सरकारने अभिनेत्री कंगना रनौतला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. सीएम जयराम ठाकूर म्हणाले की, कंगना ही राज्याची कन्या आहे. त्यामुळे तिला सुरक्षा देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीवरून कंगना रनौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. या विषयावर सोशल मीडियावर देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या वादाला आता राजकीय वळण लागत आहे. या संदर्भात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, राज्य सरकारने कंगना रनौत यांना राज्यात सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मुंबई दौर्‍यादरम्यान सुरक्षा पुरवण्याबाबतही सरकार विचार करत आहे.मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, ती हिमाचल प्रदेशची मुलगी आणि सेलिब्रेटी असल्याने तिला सुरक्षा पुरविणे हे आपले कर्तव्य आहे.कंगना ९ सप्टेंबरला मुंबईला जाणार आहे आणि या काळात सरकार त्यांना सुरक्षा देण्याच्या विचारात आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget