मध्य रेल्वे सोडणार अतिरिक्त विशेष लोकल ; प्रवाश्यांची गर्दीतून होणार सुटका

मुंबई - मुंबईत सध्या फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवल्या जात आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांची मोठी संख्या तसेच कामाच्या वेळांमधील साम्य लक्षात घेता लोकलमध्ये मोठी गर्दी होताना दिसत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आधी पश्चिम रेल्वेने पाऊल टाकले आणि आता तसाच निर्णय मध्य रेल्वेनेही घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज साडेतीनशे विशेष लोकल चालवल्या जात होत्या. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अलीकडेच त्यात वाढ करण्यात आली. विशेष लोकलची संख्या दीडशेने वाढवून पाचशे पर्यंत नेण्यात आली. त्यावेळी मध्य रेल्वे कडूनही लोकलची संख्या वाढवण्यात यावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत होती. त्याचा विचार करून मध्य रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर आजपासून अतिरिक्त ६८ लोकल चालवण्यात येत आहेत. या ६८ लोकलपैकी ४६ लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, खोपोली, कर्जत दरम्यान चालवण्यात येत आहेत तर अन्य २२ लोकल हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि गोरेगाव या दरम्यान चालवण्यात येतील, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मध्य रेल्वे मार्गावर आधी ३५५ विशेष लोकल दररोज धावत होत्या. ती संख्या आता ४२३ वर पोहचली आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget