भिवंडी इमारत दुर्घटनेत ३३ जणांचा मृत्यू

भिवंडी - भिवंडीत इमारत कोसळल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३३ वर गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये १५ लहान बालकांचा समावेश आहे. तर आतापर्यंत एकूण २५ जणांना ढिगाऱ्याकडून बाहेर काढण्यात यश आले आहे. या सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या लोकांना भिवंडी आणि ठाण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर मदतकार्य सुरु आहे. ४३ वर्ष जुनी जिलानी इमारत सोमवारी कोसळली. इमारतीमध्ये ४० फ्लॅट होते आणि जवळपास १५० लोक येथे राहत होते. इमारत दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. इमारतीच्या मालकाविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, अनधिकृत इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दंड आकारणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget