तेलंगणा संसदेजवळ आत्मदहनाचा प्रयत्न

हैदराबाद - तेलंगाणाच्या संसदेजवळ एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला वेळी रुग्णालयता दाखल करण्यात आले. ही व्यक्ती वॉचमन म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत स्पष्टता मिळाली नाही. मात्र, काही स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, याचा त्याच्या नोकरीशी काहीही संबंध नव्हता.काही स्थानिक वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेजही चालवली. यामध्ये ही व्यक्ती मोठ्याने "केसीआर सर" आणि "जय तेलंगणा" असे ओरडताना दिसून येत आहे. (तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना 'केसीआर' असे म्हटले जाते.)एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीकडे असलेल्या पिशवीतील बाटलीमध्ये पेट्रोल होते. त्याने हे पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले, आणि स्वतःला पेटवून घेतले. हे पाहताच दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याच्याकडे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. या घटनेत हा व्यक्ती २५ टक्के भाजला गेला होता.ही व्यक्ती महबूबनगर जिल्ह्यातील रहिवासी असून, दोन दिवसांपूर्वी आपल्या पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर तो घरातून निघून गेला होता अशी माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. अधिक तपास सुरू आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget