अनिल अंबानीने वकिलाची फी देण्यासाठी विकले दागिने

नवी दिल्ली - देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या पंक्तीत बसणारे उद्याेजक अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाल्याचे समोर आले आहे. वकिलाची फी देण्यासाठी पैसे नसल्याने घरातील दागिने विकल्याची माहिती अंबानी यांनी लंडनच्या न्यायालयाला दिली आहे. अनिल अंबानी यांच्याकडून ५२८१ करोड रुपये वसूल करण्यासाठी चिनी बँकांनी अंबानी यांच्याविरोधात खटला भरला आहे. या खटल्यावर लंडनमध्ये सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान अनिल अंबानी यांनी दागिने विकल्याची माहिती न्यायालयाला दिली.

अंबानी यांनी न्यायालयामध्ये म्हटले, की “जानेवारी ते जून २०२० दरम्यान मी ९.९ करोड रुपयांचे दागिने विकले. आता माझ्याकडे कोणतीही मौल्यवान वस्तू नाही.” तसेच आपल्याकडे महागड्या गाड्याही नसल्याचा दावाही त्यांनी केल्याचा सूत्रांनी सांगितले. माझ्याकडे रोल्स रॉयल्स कार नसून, मी साधी कार वापरतो, असेही त्यांनी सांगितले आहे.

अनिल अंबानी यांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर २०१९ ला त्यांच्या खात्यात ४०.२ लाख रुपये होते. तर १ जानेवारी २०२० ला त्यांच्याकडे फक्त२०.८ लाख रुपये शिल्लक राहिले.

दरम्यान, अंबानी यांनी “माझ्याकडे आता कमाईचे दुसरे कोणतेही साधन नाही. माझी पत्नी आणि तिचे कुटुंबीयच माझा सर्व खर्च उचलतात.” असेही त्यांनी कोर्टाला सांगितले. त्यामुळे धनाढ्य उद्योगपतींच्या पंक्तीत बसणारे अनिल अंबानी यांच्यावर दागिने विकायची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अंबानी यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी शक्य तितक्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करणार असल्याचे चिनी बँकांनी म्हटले. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget