बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू – रोहित पवार

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “बिहार निवडणूक जवळ येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू झाले, आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहार मध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत. याआधी देखील राजकारणासाठी ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा’, ‘माझे अंगण,माझे रणांगण’ यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपने केलेली आहेत” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत असे दिसते परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याच काम विरोधकांनी बंद करावं, महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही” असे देखील रोहित पवार यांनी म्हणाले. . सोशल मीडियावरून रोहित पवार यांनी याबाबतची पोस्ट शेअर केली आहे.
महाविकास आघाडीचा एक घटक आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या पीडितांना लवकर न्याय मिळावा अशीच माझी मागणी असते. वाईट याच वाटत की, अशा गोष्टी घडल्यानंतर ठरावीक लोक लगेचच राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करायला लागतात. बिहार निवडणूक जवळ येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू झाले, आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहार मध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत. 
कंगना राणौत प्रकरणावरुन बिहारमधील लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. कंगनाला राज्य सरकार निशाणा बनवत आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या होत आहे असे त्यांनी म्हटले होते. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना चांगलीच चपराक लगावली आहे. याबाबत रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना खुले पत्र लिहिले आहे. तुम्ही राजकारणासाठी सोपा मार्ग निवडत आहात याचे दु:ख आहे. फक्त राजकीय हेतूसाठी महाराष्ट्रावर चिखलफेक केली तर राज्यातील जनता कधीच सहन करणार नाही असा इशारा आमदार रोहित पवारांनी चिराग पासवान यांना दिला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget