एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा

मुंबई - भाजपातील जेष्ठ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. परंतु, त्यांना पक्षात प्रवेश देऊन कोणती जबाबदारी द्यायची? याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात चर्चा करण्यात आली. त्यामुळे भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील नेमका कोणता नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना नेतृत्वावर टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यांच्या एका निर्णयामुळे राजकीय पटलावर मोठे वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील बड्या नेत्याला पक्षात प्रवेश देण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात बुधवारी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांचे म्हणणे ऐकून घेऊनच भाजपच्या या बड्या नेत्याला पक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठीच पवारांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात चर्चा झाल्याची समजते. राष्ट्रवादीकडून प्रवेश करु इच्छिणा-या या नेत्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपचा हा बडा नेता कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उत्तर महाराष्ट्र भाजपमध्ये दोन गट पडलेले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र भाजपात सध्या असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे याबाबत कोणतेही जाहीर वक्तव्य केले नसले तरी भाजपमध्ये नाराज असणारे खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. जळगावमध्ये राष्ट्रवादीची कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी खडसेंपुढे प्रस्ताव मांडणे हे राष्ट्रवादीच्या दृष्टीने फायद्याचे ठरू शकते, असे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला वाटत आहे.गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि खडसे यांच्यात खटके उडत आहेत. किंबहुना खुद्द खडसे यांनी कित्येकदा आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नाराजीचा सूर आळवल्याचेही पाहायला मिळाले आहे. 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget