मशिदीत नमाझ अदा करण्यापूर्वी खासदार इम्तियाज यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

औरंगाबाद - परवानगी नसतानाही मशिद उघडून नमाझ अदा करण्यासाठी जाणारे एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, मंदिर-मशिद प्रवेश करणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच खबरदारी म्हणून खासदार जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 
खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी शहरातील शहागंज येथील मशिदीत प्रवेश करून नमाझ अदा करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी त्याआधीच कारवाई करत खासदार जलील यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे शहागंज मशिद परसरात एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मशीद परिसरात कुणालाही प्रवेश मिळणार नाही, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.
खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले की, आमचं आंदोलन हे प्रतिकात्मक होते. आम्ही मशिदीत हजारोंच्या संख्येने जाणार नव्हतो. मोजक्याच लोकांना घेऊन आम्ही मशिद उघडून नमाझ अदा करणार होतो. मात्र, त्यासाठीच पोलिसांनी आम्हाला रोखले आणि ताब्यात घेतले. मात्र, राज्य शासनाने धार्मिकस्थळं लवकरात लवकर उघडावीत, अशी मागणी खासदार जलील यांनी केली आहे. तसेच शहागंजमधील मशिद परिसरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असे आवाहन देखील खासदार जलील यांना केले. 
दरम्यान, राज्यातील धार्मिकस्थळे खुली करण्याच्या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा दिला होता. खासदार जलील मंदिरात प्रवेश करणार होते. तितक्यात MIM मंदिर उघडण्याच्या आंदोलनाला शिवसेनेने कडाडून विरोध केला. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र, खासदार जलील हे मशिद उघडून नमाझ अदा करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget