१ ऑक्टोबरपासून टोलदरात होणार वाढ

मुंबई -  मुंबईत येणाऱ्या सर्वच वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबईतील पाचही प्रवेशद्वाराला असलेल्या टोलनाक्यावरील टोलदरात वाढ करण्यात आली आहे. टोलदरात ५ ते २५ रुपयांची वाढ  ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्यासाठी बंद आहे. तर एसटी-बेस्ट बसची संख्याही मर्यादीत आहे. अशावेळी अनेकजण मुंबईत येण्यासाठी व मुंबईबाहेर जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करतात. वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस रोड आणि दहिसर अशा पाच ठिकाणी मुंबईत प्रवेश करताना टोलनाके आहेत.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ५५ उड्डाणपूल बांधले आहेत. या पुलाचा खर्च वसूल करण्यासाठी पाच टोलनाक्याच्या माध्यमातून टोल वसुली केली जाते. तर करारानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरात वाढ केली जाते. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून पाचही टोलनाक्यावरील दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत येण्यासाठी जादा पैसे वाहनधारकांना द्यावे लागणार आहेत.नव्या दरवाढीनुसार५ ते २५ रुपयांनी टोलदरात वाढ करण्यात येणार आहे. लहान वाहनांसाठी एका फेरीकरता ३५ रुपयांऐवजी ४० रुपये द्यावे लागणार आहेत. तर मिनी बससाठी ५५ रुपयांऐवजी ६५ रुपये टोल असणार आहे. मिनीबससाठी टोलदरात १० रुपयांची वाढ झाली आहे. तर ट्रकसाठीच्या टोलमध्ये २५ रुपयांची वाढ झाली आहे. ट्रकसाठी १०५ रुपयांऐवजी १३० रुपये दर असणार आहे. अवजड वाहनांच्या टोल दरातही २५ रुपयांची वाढ झाली आहे. या वाहनांसाठी १३५ ऐवजी १६० रुपये दर लागू होणार आहे. वाहनांना टोलसाठी मासिक पास१ हजार ४०० रुपयांवरून १ हजार ५०० रुपये करण्यात आला आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget