डोंगरीत इमारतीचा भाग कोसळला

मुंबई - डोंगरी येथील सरदार वल्लभभाई पटेल रोडवर भारत पेट्रोल पंप समोर असलेल्या रझाक चेंबर इमारतीचा भाग आज सकाळी कोसळला.घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा जणांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
मुंबईत डोंगरी येथील सरदार वल्लभभाई पटेल रोडवर भारत पेट्रोल पंप आणि एस टी इमारतीसमोर रझाक चेंबर इमारत आहे. ही इमारत म्हाडाची सेस इमारत असून ती चार मजली इमारत होती. डोंगरी येथील सरदार वल्लभभाई पटेल रोडवर भारत पेट्रोल पंप समोर सात मजली एसटी इमारत आहे. आज सकाळी ७. ३० वाजण्याच्या सुमारास या इमारतीचा तिसऱ्या मजल्यापासून सातव्या मजल्यापर्यंतचा काही भाग कोसळला आहे. इमारतीचा काही भाग कोसळल्याने जिन्याखाली एक महिला अडकली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलीस कंट्रोल रूमला मिळाल्यावर तशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला देण्यात आली आहे.घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यासह अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी ढिगारा उपसून या महिलेचा तसेच आणखी कोणी व्यक्ती अडकले आहे का? याचा शोध सुरू केला आहे.




Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget