काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल

नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून हटविण्यात आले आहे. ते हरयाणा राज्याचे प्रभारी होते.शुक्रवारी करण्यात आलेल्या संघटनात्मक फेरबदलामध्ये सर्वात मोठा फायदा काँग्रेसचे नेते राहुल गांधींचे निष्ठावंत रणदीपसिंह सुरजेवाला यांना झाला आहे. रणदीपसिंह सुरजेवाला यांचा आता काँग्रेस अध्यक्षांना सल्ला देणा-या उच्चस्तरीय सहा सदस्यांच्या विशेष समितीमध्ये सहभाग असणार आहे. याशिवाय, रणदीपसिंह सुरजेवाला यांना काँग्रेसचे महासचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यांना कर्नाटकचे प्रभारी करण्यात आले आहे. सहा सदस्यांच्या विशेष समितीमध्ये ए के अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश आहे.विशेष म्हणजे, गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, मोतीलाल वोरा, मल्लिकार्जुन खर्गे यांना महासचिव पदावरून हटवले आहे. सगळ्यात महत्त्वाचे महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याऐवजी एच. के. पाटील आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी करण्यात आली आहे. मुकुल वासनिक यांच्याकडे आधी चार राज्यांचा प्रभार होता. त्यामधील तीन काढून घेण्यात आले असून एक कायम ठेवला आहे.मधुसूदन मिस्त्री यांची केंद्रीय निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी करण्यात आले आहे. याशिवाय, के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.काँग्रेस महासचिवांमध्ये मुकुल वासनिक यांना मध्य प्रदेशची, हरीश रावत यांना पंजाबची, ओमान चांडी यांना आंध्र प्रदेशची, तारिक अन्वर यांना केरळ आणि लक्षद्वीपची, जितेंद्र सिंह यांना आसामची आणि अजय माकन यांना राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे. जितिन प्रसाद यांना पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटांच्या काँग्रेसचे प्रभारी करण्यात आले आहे. जितिन प्रसाद यांच्यासाठी संघटनेतील एक मोठी झेप असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे, जितिन प्रसाद हे वादग्रस्त पत्रावर स्वाक्षरी करणा-या नेत्यांपैकी एक होते. तसेच, सध्याच्या संघटनेतील बदलानंतर पवनकुमार बन्सल हे प्रभारी प्रशासन सचिव असतील. याशिवाय राहुल गांधी यांचे निष्ठावंत मानकीम टागोर यांची तेलंगणाच्या प्रभारी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रात पुन्हा एकदा कर्नाटकातील नेत्याची महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी लोकसभेचे विरोधी माजी विरोधी पक्षनेते व कर्नाटकमधील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे राज्याचे प्रभारी होते. आता त्यांच्या जागेवर पुन्हा एकदा काँग्रेसने महाराष्ट्राला कर्नाटकमधील काँग्रेस नेता दिला असून यासाठी माजी मंत्री एच. के. पाटील यांची काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असणाऱ्या राजीव सातव यांच्याकडे गुजरातचे प्रभारीपद देण्यात आले आहे. तर रजनी पाटील आणि मुकूल वासनिक यांच्यावर अनुक्रमे जम्मू-काश्मीर आणि मध्य प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget