नागपूरचा धावपटू कायरान डिसूजाचा नवा विक्रम

मनाली - नागपूरचा धावपटू कायरेन डिसूजा याने मनालीतील १३ हजार फूट उंट हामटा आणि रोहतांग पर्वतांमधील दरी १९ तासात पार करून नवीन विक्रम केला आहे. डिसूजाने रात्री १२ वाजता मनालीहून धावायला सुरुवात केली होती. सकाळी डिसूजा १३ हजार फूट उंच हामटा पर्वतावर पोहोचला. त्यानंतर हामटाहून पूर्ण दिवस धावत रोहतांग पार करून रविवारी संध्याकाळी डिसूजा मनालीत पोहोचला. मनालीत उपविभागीय दंडाधिकारी रमन घरसंगी यांनी डिसूजाचे स्वागत केले. दरम्यान, हा विक्रम करताना डिसूजाची टीम मदतीला त्यांच्यासोबत होती. डिसूजाने केवळ १९ तासात १२६ किलोमीटर लांब रूट पूर्ण केला. हा विक्रम करण्यासाठी डिसूजाने यापूर्वीदेखील हा पर्वत पार केला होता. हामटा आणि रोहतांग पर्वत १३ फूटांपेक्षा जास्त उंच आहेत. ट्रिपल ट्रबल रन नावाचा हा कार्यक्रम फॉर प्ले मीडिया मनाली यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मनाली प्रशासनासहीत अटलबिहारी वाजपेयी पर्वतारोहण आणि क्रीडा संस्थेने मदत केली.टीमचे सदस्य प्रशांत भट्ट, आदित्य विक्रम पांडे, मोहित शर्मा, उत्कर्ष मित्तल, अभिलाष महाजन, राहुल रावत, क्षितिज गुप्ता व शुक्ला गुप्ता यांनी सांगितले की रात्री १२ वाजता डिसूजाने मनालीहून धावायला सुरुवात केली आणि अलेउ, प्रीणी, सेथन या मार्गावरून तो जोत याठिकाणी पोहोचला.डिसूजा न थांबता हामटा पार करत लाहौल भागातील छतड्डूत पोहोचला. छतड्डूहून रस्त्याने ग्रांफूत पोहोचला. तेथून रोहतांग दरी पार करून सायंकाळी सात वाजता मनाली बाजारात पोहोचला. याआधीदेखील डिसूजाने जून महिन्यात १६ हजार फूट उंड फ्रेंडशिप पीकवर १२ तासांत चढून विक्रम रचला आहे.डिसूजाने इंडियन नेशनल टीम अल्ट्रा अ‌ॅण्ड ट्रेल रनिंगमध्येही भाग घेतला होता. तसेच वर्ल्ड ट्रॅव्हल सिरीज चॅम्पियनशिप आणि २४ तास रनिंग चॅम्पियनशिमध्येही भाग घेतला होता. डिसूजा ग्रीसमध्ये २४६ किलोमीटरच्या हिस्टॉरिकल रेसमध्ये पोहोचणारा एकमेव भारतीय होता. फ्रांसमध्ये आयोजित युटीएमबी सीसीसी एज कॅटेगरीत त्याने दुसरा क्रमांक मिळवला होता. तर फ्रांसमधील एगेर अल्ट्रामध्ये सातवा आणि एंडींग स्काई अल्ट्रात आठवा क्रमांक मिळवला होता.देशातील तरुणांना धावण्यासाठी प्रेरणा देणे हा या सर्व अभियानाचा उद्देश असल्याचे कायरान डिसूजाने सांगितले
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget