LAC वर चीनकडूनच गोळीबार

नवी दिल्ली - सोमवारी पुन्हा एकदा भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाल्याची माहिती समोर आली ज्यानंतर या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा सीमावादाचा मुद्दा आणखी चिघळत असल्याचे पाहायला मिळाले. भारतीय सैन्याने LAC ओलांडत गोळीबार केल्याचा दावा चीनकडून करण्यात आला होता. पण, भारताकडून असे कोणतेही कृत्य केले नसल्याची स्पष्ट माहिती आता देण्यात आली आहे.७ सप्टेंबरच्या रात्री चीनच्या सैन्याकडूनच भारतीय सैन्याला चिथवण्याचा प्रयत्न केला होता. मुख्य म्हणजे भारताकडून गोळीबार करण्यात आला नसल्याची महत्त्वाची माहिती भारताच्या संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली आहे. 
एका अधिकृत निवेदन पत्रातून ही बाब मांडण्यात आली. ज्यामध्ये चीनकडून वारंवार भारताला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. चिनी सैनिकांनीच भारत्या फॉरवर्ड पोस्टवर येण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर भारतीय सैनिकांनी त्यांना रोखले. त्याचवेळी चीनच्या सैन्याकडून हवेत गोळीबार करण्याच आल्याची माहिती यात देण्यात आली आहे.
दरम्यान, चीनकडून गोळीबार होत असतानाही भारतीय सैन्याने या कृत्याची पुनरावृत्ती केली नसल्याची स्पष्ट माहिती निवेदनातून मांडण्यात आली. शिवाय चीनकडून देण्यात आलेले निवेदन हे दिशाभूल करणारं असल्याचा आरोपही भारताकडून लावण्यात आला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget