जसे PM दिल्लीत बसूनच निर्णय घेतात, तसे CM वर्षावर बसून निर्णय घेतात, यात बिघडले कुठे? - अजित पवारांचा विरोधकांना प्रश्न

मुंबई - भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत आहे. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाही. तसेच आज विरोधक सकाळी आरोप करत होते की काही ठिकाणी अजिबात सरकारचे लक्ष नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष आहे. देशाचे पंतप्रधान दिल्लीत बसूनच निर्णय घेतात, व्हीसी घेतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'वर्षा' या सरकारी निवासस्थानातून निर्णय घेतात,यात बिघडले काय, असा थेट प्रश्न विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. विधानपरिषदेत आज अजित पवार पुरवणी मागण्यांवर उत्तर दिले तेव्हा विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. 
विरोधक काही गोष्टी बोललेत. आरोप केले. त्यावर बोलले पाहिजे म्हणून मी उभा आहे. केंद्रातील सरकारने २२ हजार कोटी रुपये दिलेले नाहीत, आता PPE किट मास्क वगैरे देणार नाही म्हटले आहे. राज्य सरकारला नोटा छपायचा अधिकार नाही, अडचण असतांनाही आम्ही अनेक ठिकाणी पैसे दिले. गहू, तांदूळ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आजच निर्णय घेतला आहे की, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ३२४४ कोटी रुपये वितरित करत आहोत, यापैकी ५० टक्के कोविडसाठी देत आहोत.आर्थिक चणचण असली तरी राज्यातील जनतेसाठी कितीही पैसे लागले तरी ते उभे करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 
अर्थचक्र पुढे चालू राहण्यासाठी उद्योगधंदे सुरू करण्यात आले आहेत. तसेच, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी कोविड काळात सुद्धा या योजनेची अंमलबजावणी सुरूच ठेवण्यात आली. जवळपास साडे एकोणतीस लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले. तसेच, साडे सहा लाख आदिवासी बालकांना आणि महिलांना मोफत दुध भुकटी देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget