रामदासआठवलेंनी घेतली कंगनाची भेट; RPI चा कंगनाला पाठिंबा

मुंबई - रिपब्लिकन पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पाठिशी आहेत. मुंबई ही सर्व पक्षाचा आणि सर्वांची आहे. मुंबईत राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. कंगनाला मुंबईत घाबरण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. रामदास आठवले यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.माझी कंगनासोबत खूप विषयावर चर्चा झाली. कंगनाला उगाच त्रास झाला आहे. त्यामुळे मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहे. तसेच याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.
कंगना ड्रग्स घेत होती हे सामनात कसे छापले, असा प्रश्न रामदास आठवलेंनी उपस्थित केला. शिवसेना खासदार संजय राऊत आणि सामनावर केस व्हायला हवी, असेही रामदास आठवले म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर फार गर्व आहे. माझे सौभाग्य आहे की तुम्ही आमच्या घरी आलात. तुमचा आशिर्वाद असू द्या. तुम्ही हिमाचलमध्ये कधी आलात तर तिथे आदरातिथ्य करण्याचा मला संधी द्या. असे कंगना आठवलेंच्या भेटीदरम्यान म्हणाली.कंगना आणि रामदास आठवले यांच्यात दीड तास चर्चा सुरु होती.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget