राज्य पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती

मुंबई - राज्य पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केलेत. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.अखिल भारतीय पोलीस सेवेत दरवर्षी २५ टक्के जागा स्थानिक राज्य पोलीस सेवेतून भरल्या जातात. त्यासाठी प्रत्येक राज्य आपल्या राज्याच्या कोटय़ानुसार पात्र उमेदवारांचे प्रस्ताव केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवतात. त्यानंतर लोकसेवा आयोग पात्र उमेदवारांची निवड करून अंतिम यादी केंद्र सरकराला कळवते. राज्य पोलीस सेवेत अधीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांची आयपीएस पदोन्नती होते.

आयपीएस पदोन्नती झालेल्यांची नावे

एस. जी. वायसे पाटील, ए. एम. बारगळ, एन. टी. ठाकूर, एस. एल. सरदेशपांडे, नितीन प्रभाकर पवार, डी. पी. प्रधान, एम. एम. मोहिते (शीला डी सैल), पांडुरंग पाटील, टी.सी दोशी, डी.बी पाटील(वाघमोडे) एस.एस. बुरसे, सुनीता साळुंखे- ठाकरे, एस. एन.परोपकारी, एस. एस. घारगे, रवींद्रसिंग परदेशी आणि पुरुषोत्तम कराड यांची निवड झाली आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget