एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांतदादाची प्रतिक्रिया

मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केले. प्रदेशाध्यक्ष म्हणून एकनाथ खडसेंचा राजीनामा माझ्याकडे आला. राजीनामा हातात पडेपर्यंत आम्ही आशावादी होतो, की नाथाभाऊ ही स्टेप घेणार नाहीत. पण त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला हे कटू सत्य असल्याचे पाटील म्हणाले.  

एकनाथ खडसेंनी पक्षात राहवे, पक्षाच नेतृत्व करवे असे आम्हाला वाटत होते. राजीनामा द्यायची वेळ का आली ? असा प्रश्न त्यांना विचारला असता या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले. पक्षामध्ये त्यांचे स्थान आहे. पक्षामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला का ? जे जे घडल त्या प्रत्येकावर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. त्यामुळे राजीनामा का दिला ते त्यांनाच विचाराव असे पाटील म्हणाले. 

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget