तरुणांनो निराश होऊ नका, मराठा तरुणांना संभाजीराजेंचे आवाहन

कोल्हापूर - मराठा आरक्षण आपल्याला मिळणारच. तुम्ही खचून आणि निराश होऊ नका, असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तरुणांना निराश न होण्याचे आवाहन केले आहे. नीटमध्ये कमी गुण आणि मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आवाहन केले आहे. 

मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील आणि मला विश्वास आहे कीआपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही. एक लक्षात ठेवा हा समाज, 'लढून मरावे, मरून जगावे, हेच आम्हाला ठावे, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूच!, अशी पोस्ट ट्विटरवर संभाजीराजे यांनी केली आहे.

माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगले वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत, असे संभाजीराजे म्हणाले.

बीडमधील विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणे, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे, असे सांगतू समाजासाठी बलिदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली वाहली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget