पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने मदत करावी - शरद पवार

तुळजापूर  - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटून शक्य तितके जास्त कर्ज घ्यावे, अशी विनंती करणार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. ते दोन दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तुळजापूर दौऱ्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याच्या विषयावर बोलताना, संपूर्ण कर्जाच ओझे राज्य सरकारला एकटयाला झेपेला का? असा मुद्दाही उपस्थित केला आहे. 

आधी कधीच आले नव्हते,एवढे मोठे संकट राज्यावर आले आहे. गावपातळीवर रस्ते खराब झाले आहेत. यामध्य मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट आहे, असे शरद पवार म्हणाले.अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे,असे शरद पवार म्हणाले.

नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. पिक विम्यासंदर्भात शिथिलता आणण्यासाठी केंद्राकेड मागणी करणार आहे. हा प्रश्न खूप मोठा आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करायला हवी. केंद्र व राज्य सरकार दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा, असे शरद पवार म्हणाले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget