राहुल गांधी यांना धक्काबुक्की, उत्तरप्रदेश पोलिसांनी दिलेली वागणूक निंदनीय - शरद पवार

मुंबई - लोकशाहीचे जतन करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच लोकशाहीची अशाप्रकारे पायमल्ली करत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे.उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी जात असताना उत्तर प्रदेशातील पोलिसांनी त्यांना आडवले. एवढेच नाही तर त्यांच्याशी धक्काबुक्की केली. उत्तर प्रदेश पोलिसांची वागणूक अत्यंत निंदनीय असल्याचे पवार म्हणाले.

उत्तरप्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना हाथरस येथे जाऊ न देतात त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली त्याचे पडसाद देशभरात उमटले आहेत काँग्रेसकडून या घटनेविरोधात देशभर निदर्शने केली जात असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget