एकनाथ खडसेंपाठोपाठ मुलीचाही भाजपाला रामराम

जळगाव - एकनाथ खडसे यांनी भाजपामधून सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्याने राज्यात राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान एकनाथ खडसेंपाठोपाठ त्यांची कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही भाजपामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे,असा निर्धार रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीत आपला पराभव करण्याचा प्रयत्न झाला. याचे पुरावे देऊनही कोणती कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप रोहिणी खडसे यांनी भाजपावर केला आहे.

रक्षा खडसे भाजपातच राहणार –

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असले तरी खासदार असणाऱ्या त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे मात्र भाजपातच राहणार आहेत. एकनाथ खडसे यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget