भारत- चीन तणाव; भारतीय सैन्याला मिळणार १० लाख हॅण्ड ग्रेनेट

नवी दिल्ली - चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारतीय सैन्याने १० लाख हॅंण्ड ग्रेनेटच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. नागपूरच्या कंपनीसोबत ४०९ कोटी रुपयांच्या या कराराने सैन्याची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.सैन्याद्वारे हे मल्टी मोड हॅण्ड ग्रेनेड डिझाइन केले जात असून दुसऱ्या महायुद्धातील विंटेज२ डिझाइनची हे जागा घेणार आहेत.यामध्ये १० लाख मल्टी-मोड हॅंड ग्रेनेटची पूर्तता नागपूरची मैसर्स इकोनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडसोबत करार झाला आहे.

इकोनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड पूर्तता करणारे हॅंड ग्रेनेट्स हे संरक्षण अनुसंधान आणि विकास संघटनकडून (DRDO) डिझाइन केले जाणार आहे. डीआरडीओने यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. हे उत्कृष्ट डिझाइनचे ग्रेनेड आहेत. आक्रमक आणि रचनात्मक दोन्ही प्रकारच्या युद्धात याचा वापर केला जाणार आहे. भारत सरकारच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीला प्रोत्साहन देणारी ही योजना आहे. अत्याधुनिक दारु गोळा औद्यागिकीकरणात 'आत्म निर्भर'ला सक्षम बनवण्यात येणार आहे.

चीनशी दोन हात करण्यासाठी भारत सरकार सैन्याचे हात मजबूत करत आहे. यासाठी उपकरण आणि हत्यार खरेदी करण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली. संरक्षण अधिग्रहण परिषदेने भारतीय सशस्त्र बळास विविध आवश्यक उपकरणांसाठी लागणाऱ्या निधीच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली आहे. २,२९० कोटी रुपये यासाठी खर्च केले जाणार आहेत. स्मार्ट एंटी एअरफील्ड वेपन, एचएफ रेडीओ सेटसोबत SIG SAUER असॉल्ट राइफल्स खरेदी करण्याची योजना देखील आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget