हाथरस घटने प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली - हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा विशेष पथकाकडे देण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सत्यम दुबे यांनी ही याचिका दाखल केली आहे. सीबीआय अथवा हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील तपास पथकाने याचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशऐवजी दिल्ली पोलिसांकडे हा तपास देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना आहे. काल उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते.  बलात्कार करुन तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचे अमानुष कृत्य करण्यात आले होते. या घटनेवर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

 हाथरसमध्ये निर्दोष मुलीबरोबर जी अमानुष घटना घडली, तो आपल्या समाजावर कलंक आहे. हाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारद्वारे मारले गेले आहे अशी टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget