विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

मुंबई - विद्यापीठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी सुरू केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून शासनाने मागण्या मान्य न केल्यास पुन्हा १९ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समितीने काम बंद आंदोलन सुरू केले. बहुतेक विद्यापीठांनी त्यामुळे गुरूवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलल्या. संघटनांचे प्रतिनिधी आणि शासनात गुरूवारी झालेल्या चर्चेनंतर संघटनेने त्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, १७ ऑक्टोबपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १९ ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे,असे संघटनेने त्यांच्या पत्रकात नमूद केले आहे. सातवा वेतन आयोग लागू करावा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ कार्योत्तर मान्यता घेऊन पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावे, अशा काही मागण्या संघटनेने केल्या होत्या.

मुंबई विद्यापीठ वगळता राज्यातील बाकी बहुतेक विद्यापीठांनी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर अंतिम वर्षांच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १२ ऑक्टोबरपासून परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मागण्या मान्य न झाल्यास १९ पासून पुन्हा आंदोलन सुरू होण्याची टांगती तलवार विद्यापीठ प्रशासनावर आहे. त्यामुळे आता संघटनांनी आंदोलन मागे घेतले तरी परीक्षांबाबतचा संभ्रम कायम आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget