उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहीचा गैरवापर,गुन्हा दाखल

बारामती (पुणे) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहीचा गैरवापर करून मुंबई येथील बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहरातील तुषार तावरे (रा.तारांगण सोसायटी, बारामती) याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मुंबईतील बांधकाम व्यवसायिक अजय कामदार यांना मी उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून बोलतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या विरुद्ध तक्रार आली आहे. ती तक्रार तुमच्या व्हॉट्सअ‌ॅपवर पाठवली आहे, असे मोबाईलवरून सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदार कामदार यांनी आपल्या व्हॉट्सअ‌ॅपवरील मेसेज व तक्रारी अर्ज आल्याचे दिसले. त्यावर त्यांना बांधकाम व्यवसायासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहीचा तक्रारी अर्ज दिसून आला. या तक्रारी अर्जावर उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे दिसले.यावर तक्रारदाराने घाबरून आरोपी तुषार तावरे यांच्याशी संपर्क साधला असता. तावरे यांनी तक्रारदाराला तुमच्याविरुद्ध दिलेला अर्ज मी आयुक्तांकडे न पाठवता माझ्याकडे ठेवला आहे. तुमचे व अर्जदार यांचे जे वाद आहेत ते तीन दिवसात मिटवून घ्या नाही तर आपल्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. यावर तक्रारदाराने घाबरलेल्या अवस्थेतच उपमुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असता. तुषार तावरे नावाची कोणतीही व्यक्ती कार्यालयात काम करत नाही, असे सांगण्यात आले. पवार यांचे सहाय्यक सुनील मुसळे यांनी कामदार यांना कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार अजय कामदार यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस ठाण्यात आरोपी तुषार तावरे यांच्याविरोधात तोतयेगिरी करून फसवणूक केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget